Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SHORT AND SWEET :‘मन मतलबी’गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा

Webdunia
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (12:34 IST)
SHORT AND SWEET वडील आणि मुलाच्या नाजूक नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अॅन्ड स्वीट’ या चित्रपटातील ‘मन मतलबी’ हे भावनाप्रधान गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मंगेश कांगणे यांचे बोल लाभले आहेत तर हे हृदयस्पर्शी गाणे नकाश अझीझ यांनी गायले आहे. हर्षद अतकरी याच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे बोल मनाच्या खोलवर जाणारे आहेत. हर्षदचा कॅालेज हॅास्टेलपासून घरापर्यंतचा प्रवास या गाण्यात दिसत असून या दरम्यान त्याला अशा गोष्टी दिसत आहेत, ज्या त्याच्या मनाला अस्वस्थ करत आहेत. मनात त्याच्या काही द्वंद सुरू आहे. अतिशय श्रवणीय असे हे गाणे असून प्रत्येक शब्दात भावार्थ आहे. 
  
या गाण्याबद्दल दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ‘’मन मतलबी या दोन शब्दांमधूनच बऱ्याच भावना व्यक्त होत आहेत. गाण्यातच वडिल आणि मुलाच्या नात्यातील अनेक तऱ्हा दिसत आहेत. हे नाते वरवर पाहता खूप कठोर दिसत असले तरी खूप हळवे आणि संवेदनशील असे आहे. त्यामुळे प्रत्येक मुलगा आणि वडिल हे गाणे स्वतःशी जोडू शकतील. गाण्याची टीमही दमदार आहे.’’शुभम प्रोडक्शन निर्मित, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: प्रसिद्ध दुर्गा मंदिरे, या शारदीय नवरात्रीला भेट द्या

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

सफर निसर्गरम्य बूंदीची

पुढील लेख
Show comments