Dharma Sangrah
✕

'द प्ले दॅट गोज राँग' आता मराठीत

Webdunia
गुरूवार, 2 मे 2019 (10:54 IST)
मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांवर आपली मोहोर उमटवणारे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे, लवकरच एक नवंकोरं नाटक घेऊन मराठी प्रेक्षकांसमोर येत आहे. 'वाजले कि बारा!’असे या नाटकाचे नाव असून, बाॅलीवूड अभिनेता शर्मन जोशीच्या शर्मन जोशी प्रॉडक्शन प्रस्तुत आणि स्वामी क्रिएशन निर्मित सादर होत असलेल्या या नाटकाचा, महाराष्ट्र दिनानिमित्ताने सिद्धिविनायकाच्या चरणी श्रीगणेशा करण्यात आला. केदार शिंदे दिग्दर्शित हे नाटक 'द प्ले दॅट गोज राँग' या वेस्टएन्ड आणि ब्रॉडवे म्हणजेच, लंडन अमेरिकेत गाजलेल्या नाटकाचे अधिकृत रिमेक असल्याचं सांगितलं जात आहे.
 
जुलै-ऑगस्टदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या नाटकाद्वारे शर्मन जोशी प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून मराठी नाट्यसृष्टीत आपलं पहिलं पाऊल टाकत आहे.
 
'द प्ले दॅट गोज राँग' हे नाटक वेस्टएन्ड व ब्रॉडवे म्हणजेच लंडन आणि अमेरिकेत सुपरहिट चालत आहे. हे नाटक केदार - शर्मन जोडीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत भारतात सादर करण्याचे धाडस यापूर्वी केले होते. विशेष म्हणजे, 'द प्ले दॅट गोज राँग' च्या ह्या रिमेकला भारतीय प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ह्या नाटकाचा मराठी रिमेक असलेलं 'वाजले कि बारा!’हे नाटक मराठी प्रेक्षकांनादेखील आवडेल, याची खात्री ह्या दोघांना आहे.
 
केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेली  'तू तू मी मी', 'सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदर पंत', 'गेला उडत', 'सौजन्याची ऐशी तैशी' यांसारखी दर्जेदार नाटकं मराठी रंगभूमीवर गाजली. मात्र त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदी आणि गुजराती नाटकाकडे वळवला होता. 'वाजले कि बारा!’च्या निमित्ताने केदार शिंदे तब्बल तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे परतले आहेत.
 
केदार शिंदे यांनी 'सही रे सही' हे नाटक शर्मनच्या सोबतीने 'राजू राजा राम और मैं' या रिमेकद्वारे हिंदी रंगभूमीवर आणलं होतं. गुजराती, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर सुपरहीट ठरलेली केदार-शर्मनची जोडी, आता मराठी रंगभूमीवर धम्माल करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे 'द प्ले दॅट गोज राँग' चे मराठी व्हर्जन कसं असेल, याची उत्सुकता नाट्यरसिकांना लागली नसेल तर नवलच !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

पुढील लेख
Show comments