Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

‘आणीबाणी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aanibani
, गुरूवार, 13 जुलै 2023 (20:10 IST)
The trailer of the movie Aanibani released ‘आणीबाणी’हा चार अक्षरी शब्द ऐकला की, तो काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांच्या काळया आठवणी जागृत होतात. त्यामुळे  पुन्हा ‘आणीबाणी’नको अशी भावना असलेल्या जनतेला आता मात्र मनोरंजनाच्या आणीबाणीला सामोरं जावं लागणार आहे. येत्या २८जुलैला  मनोरंजनाची ही  ‘आणीबाणी’लागू होणार आहे.  तत्पूर्वी  मनोरंजनाची  ही ‘आणीबाणी’नेमकी  काय असणार आहे? याची झलक नुकतीच एका शानदार कार्यक्रमात दाखविण्यात आली.  
 
'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’हा मराठी चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  छोट्या  पडद्यावर काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या सोबतीने  दाखवलं  आहे.  या  चित्रपटाच्या दिमाखदार ट्रेलरचे अनावरण कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले. 
 
याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक दिनेश जगताप म्हणाले की पदार्पणात दिग्ग्ज कलाकारांसह एका वेगळ्या विषयाचा  चित्रपट करता आला याचा खूप आनंद आहे. निखळ हास्याची मेजवानी देणारा हा  चित्रपट  प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  ‘संहिता ही नेहमीच मराठी चित्रपटाचं बलस्थान राहिली आहे. ‘आणीबाणी’चं कथानक ही चित्रपटाची जमेची बाजू असल्याचं सांगत, अभिनेता उपेंद्र लिमये यांनी चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त केला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, ‘आणीबाणी’च्या बाबतीत  मला हे जाणवलं असं सांगत. ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या  दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे आभार अभिनेत्री वीणा जामकर हिने मानले. अभिनेता संजय खापरे यांनी मातब्बर कलाकार मंडळीसोबत  काम करता आल्याचं समाधान व्यक्त करताना, चित्रपटातील  प्रत्येक व्यक्तिरेखा  दमदार असल्याचं सांगितलं.   
 
आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही एका गावातल्या कुटुंबाची  हलकी-फुलकी गोष्ट आहे. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर  ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा चित्रपटात  मांडण्यात आली आहे.
 
उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशी  मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी  या  चित्रपटात आहे. कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 
 
‘आणीबाणी’ चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक, कलादिग्दर्शन सुधीर सुतार तर साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय, किरण कोट्टा आणि मिक्सिंग नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी  केले असून  संकलन प्रमोद कहार यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.   
 
‘आणीबाणी’ २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तमन्ना भाटिया 'वेदा' चित्रपटात जॉन अब्राहमसोबत दिसणार