Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परिपूर्ण सौंदर्याने नटलेले ‘वेल डन बेबी’चे आगामी गाणे ‘हलकी हलकी’

Webdunia
मंगळवार, 6 एप्रिल 2021 (20:43 IST)
अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा आगामी चित्रपट ‘वेल डन बेबी’ने आपला नवीनतम ट्रॅक ‘हलकी हलकी’ सादर केला असून हे एक परिपूर्ण सौंदर्याने नटलेले कर्णमधुर गाणे आहे.
 
अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शनासाठी ‘वेल डन बेबी’ला केवळ काही दिवसांचा अवधी उरलेला असतानाच  अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने चित्रपटाच्या आणखी एका नवीनतम गाण्याचे अनावरण करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ‘हल्की हल्की’ असे शीर्षक असलेले हे नवे गाणे आणि याचे सुखद संगीत कौटुंबिक-नाट्य असलेल्या या कथेत अगदी उत्तम प्रकारे बसते. याच्या लक्षवेधक व्हिडिओतील चमकदार सिनेमॅटोग्राफीसह या गाण्याचे बोल श्रोत्यांच्या हृदयाची अचूक तार छेडतात. ‘हल्की हल्की’ हा एक असा ट्रॅक आहे ज्याला प्रत्येक स्तरावरील श्रोते आपल्याशी जोडून घेऊ शकतील.
 
रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत रोहन प्रधान यांनी गायले असून वलय मुळगुंड यांनी लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या चित्रपटाच्या पहिले गाणे ‘आई-बाबा’ला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. कानसेनांचे पाय याच्या संगीतावर उत्साहाने थिरकायला लागले असून त्यांनी ते गाणे गुणगुणायला देखील सुरुवात केली आहे.  
 
‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना आश्चर्यकारकरीत्या एका वळणावर आणून उभे केले आहे. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंधा गव्हाणे लिखित, या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग निर्मित आणि व्हिडीओ पॅलेसद्वारे सादर करण्यात येत असलेला हा चित्रपट भारतातील प्राईम सदस्य 9 एप्रिल 2021 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

पुढील लेख
Show comments