Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नानंतरची गोष्ट सांगणार ‘हार्दिक शुभेच्छा... पण त्याचं काय?’धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

hardik shubhecha
, शनिवार, 1 मार्च 2025 (16:13 IST)
दमदार कलाकारांची मांदियाळी असलेल्या धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. 
चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट लग्नसंस्था आणि त्यानंतरच्या प्रवासावर आधारित असल्याचे दिसतेय. ट्रेलरमध्ये पुष्कर लग्नासाठी मुली बघत असून त्याच्या आयुष्यात हेमल इंगळे आणि पूर्वी मुंदडा आल्याचे दिसत आहेत. सोबतच त्यांच्या नात्यात काही गुंतागुंतीचे प्रसंगही दिसत आहेत. त्यामुळे पुष्करच्या आयुष्यात नेमकं कोण येणार? त्यांचे वैवाहिक जीवन कसे असणार? ‘पण त्याचं काय’ हा नेमका काय प्रश्न? तो सुटणार का?
ALSO READ: दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे ९९’च्या पोस्टरचे अनावरण
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या २१ मार्चला मिळणार आहेत. ट्रेलरमध्ये पुष्कर नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे तर हेमल आणि पूर्वीही जबरदस्त दिसत आहेत. पुष्करचे चित्रपटांमध्ये नेहमीच भव्यता असते. कथानकात वेगळेपण असतेच याशिवाय तो चित्रीकरणस्थळांमध्येही वैविध्य घेऊन येत असतो. या चित्रपटात प्रेक्षकांना ॲमस्टरडॅम, पॅरिस आणि दुबईची सैरही घडणार आहे. 
 
पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा यांच्यासह या चित्रपटात विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात," ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट फक्त लग्नानंतरच्या लैंगिक सुसंगतेबद्दल बोलत नाही, तर तो दोन व्यक्तींमधील भावनिक संवाद किती महत्त्वाचा असतो, हेही अधोरेखित करतो. लग्नानंतरचे जीवन ही नवी परीक्षा असते. या परीक्षेत प्रेम, समंजसपणा, आणि एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असते. आजच्या धकाधकीच्या जगात दाम्पत्यांनी सुसंवाद साधणे  किती महत्त्वाचे असते, हे आम्ही या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न केला असून आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच खास स्थान निर्माण करेल."
 
आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंडियन आयडॉल 15 ची स्पर्धक रितिकाची लता मंगेशकरसोबत झालेली अविस्मरणीय भेट