Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे हृदयविकाराने निधन

Veteran actor Raja Bapat passed away  Marathi Cinema News In Marathi
, मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (08:43 IST)
मराठी रंगभूमी , चित्रपट ,टीव्ही मालिकांतील ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. 
राजा बापट यांनी थोरली जाऊ, बाळा गाऊ कशी मी अंगाई, एकटी, नवरे सगळे गाढव, जावई विकत घेणे आहे. या गाजलेल्या मराठी चित्रपटात काम केले. या शिवाय त्यांनी जन्मदाता, हमीदाबाईची कोठी, शाकुंतल,पप्पा सांगा कोणाचे या नाटकात काम केले आहे. अग्निहोत्र, मनस्विनी, सखी, बे दुणे सहा या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या घरात आणि मनात स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tunisha Sharma Case: तुनिषा शर्मा प्रकरणात शीजान खानचा गुन्हा सिद्ध करणे इतके सोपे नाही, जाणून घ्या कारण