Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वृद्धापकाळाने निधन

Veteran actress Rekha Kamat dies of old age ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वृद्धापकाळाने निधन Marathi Cinema News  Marathi Cinema
, मंगळवार, 11 जानेवारी 2022 (22:32 IST)
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी काम केले आहेत.
रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविला. 1952 मध्ये प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा रेखा यांचा पहिला चित्रपट होता. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित प्रपंच ही त्यांची पहिली मालिका होती आणि या मालिकेत त्यांनी साकारलेली आक्का ही भूमिका त्याकाळी खूप गाजली होती. सांजसावल्या, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. माणूस, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, लग्नाची बेडी, ऋणानुबंध, अग्गबाई अरेच्चा! या चित्रपट, नाटक आणि मालिकेतून त्यांनी अभिनय साकारला होता.
 
रेखा यांनी कुबेराचे धन, गृहदेवता (दुहेरी भूमिका), गंगेत घोडे न्हाले, मी तुळस तुझ्या अंगणी, माझी जमीन हे त्यांचे गाजलेले चित्रपट. नेताजी पालकर चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर जगाच्या पाठीवर चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली.
 
सौभद्र, एकच प्याला, भावबंधन, संशयकल्लोळ आदी संगीत नाटकांतून तसेच दिल्या घरी तू सुखी राहा, तुझं आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, गोष्ट जन्मांतरीची, दिवा जळू दे सारी रात, कालचक्र आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी साकारल्या सर्व नाटकांची एकूण प्रयोगसंख्या पाच हजारांहून अधिक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेघालयातील हे दोन धबधबे पाहण्यासाठी एकदा नक्की भेट द्या