पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी आयसीसीच्या त्या नियमामुळे नाखूश झाला आहे, जो कोरोनामुळे पंचांना सामन्यादरम्यान खेळाडूंची टोपी घेण्यापासून रोखतो. या घटनेने भडकलेल्या आफ्रिदीने आयसीसीला प्रश्नही विचारले आहेत.
पाक सुपर लीगमध्ये खेळणार्या आफ्रिदीने टि्वट केले की, प्रिमियम आयसीसी मी हैराण आहे की, पंचांना गोलंदाजीदरम्यान टोपी घेण्यासाठी परवानगी का दिली गेली नाही. वास्तविकपणे ते त्याच जैवसुरक्षित वातावरणात असतात, ज्यामध्ये खेळाडू आणि व्यवस्थापनाचे लोक राहतात. शिवाय खेळ संपल्यानंतर हातही मिळवतात.