Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १९ टीमसाठी निवड

Webdunia
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १९ टीमसाठी निवड झाली आहे.
 
अर्जुन वडोदरा येथे होणाऱ्या जेवाई लेले ऑल इंडिया अंडर १९ वन-डे टुर्नामेंटमध्ये भाग घेणार आहे. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील टीममधून खेळला आहे. मात्र, आता त्याची निवड अंडर १९ साठी करण्यात आली आहे.
 
जेवाई लेले वनडे टूर्नामेंट १६ सप्टेंबरपासून वडोदरा येथे सुरु होणार आहे आणि २३ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये फास्ट बॉलिंगचे प्रशिक्षण घेत होता. त्याने अंडर १४ आणि अंडर १६ या टीम्समध्ये आपली जबरदस्त कामगिरी यापूर्वीच दाखवली आहे.
 
अर्जुन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये अनेक मोठ्या बॅट्समनसोबत नेट प्रॅक्टीस केली आहे. त्याने जॉनी बेयरस्टोला असा एक बॉल टाकला होता जो खेळण्यासाठी जॉनीकडे कुठलाच पर्याय नव्हता. अर्जुनने टाकलेल्या या यॉर्करनंतर प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

साप्ताहिक राशीफल 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

सर्व पहा

नवीन

ही महिला खेळाडू डब्ल्यूबीबीएलमध्ये खेळणार

ICC Ranking: कोहली-यशस्वीला कसोटी क्रमवारीत फायदा,रोहित घसरला

U-19 : राहुल द्रविड यांचा मुलगा समितचा भारतीय अंडर-19 संघात समावेश

AFG vs NZ: अफगाणिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, या तारखेला कसोटी सामना खेळवला जाणार

12 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट, वेस्ट इंडिजच्या शैनन गेब्रियल या तुफानी गोलंदाजाने निवृत्ती घेतली

पुढील लेख
Show comments