टी२० आशिया कप २०२५ साठी सर्व संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहे. युएई संघाने अखेर आपला संघ जाहीर केला आहे आणि त्यात मोहम्मद वसीमला कर्णधार बनवले आहे.
तसेच भारताला आशिया कप २०२५ चे यजमानपद मिळाले आहे, परंतु ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावामुळे तो तटस्थ ठिकाणी (यूएई) होणार आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, यावेळी आशिया कप २०२५ टी२० स्वरूपात खेळला जाईल आणि त्यात एकूण ८ संघ सहभागी होतील. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, यूएई आणि ओमान या संघांचा समावेश आहे.
आशिया कप २०२५ साठी, सर्व संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. आता सर्व संघांनी आगामी स्पर्धेसाठी त्यांचे संघ जाहीर केले आहे. सूर्यकुमार यादव आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक स्टार खेळाडूंनाही संघात संधी मिळाली आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह सारख्या स्टार गोलंदाजानेही टी-२० मध्ये पुनरागमन केले आहे.
Edited By- Dhanashri Naik