Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, अंतिम फेरीत प्रवेश

Webdunia
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (08:13 IST)
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
 
या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला असून आता त्यांची गाठ शेजारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी आहे.
 
शुक्रवारी (11 नोव्हेंबर) सायंकाळी दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवर येथे ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान हा सामना खेळवण्यात आला.
 
यामध्ये 17 चेंडूत 41 धावांची तुफान खेळी करणारा मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 19 व्या षटकात शाहीन आफ्रिदीला सलग तीन षटकार मारून अशक्यप्राय विजय खेचून आणला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर मार्शने 28 धावा केल्या. स्टोईनिसने 40 धावांवर नाबाद राहत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्या बळावर पाकिस्तानने दिलेलं 177 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 19 व्या षटकातच गाठण्यात यश मिळवलं. 26 धावांत 4 बळी घेणारा शादाब खान ऑस्ट्रेलियाला रोखू शकला नाही.
 
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. त्यांच्याकडून मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांनी अर्धशतके झळकावली. रिझवान 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावा करून बाद झाला. फखर जमानने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 32 चेंडूंत त्याने नाबाद 55 धावांची खेळी केली.
 
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 38 धावांत 2 बळी घेतले. पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांनीही 1-1 विकेट घेण्यात यश मिळवलं. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

पुढील लेख
Show comments