Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

दक्षिण आफ्रिका दौरा का रद्द करावा लागला, हे स्पष्टीकरण दिले क्रिकेट ऑस्ट्रेलियाने

दक्षिण आफ्रिका दौरा का रद्द करावा लागला, हे स्पष्टीकरण दिले क्रिकेट ऑस्ट्रेलियाने
मेलबर्न , बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (14:36 IST)
ऑस्ट्रेलियाने कोरोना महामारीमुळे सुरक्षाविषयक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेचा आपला आगामी दौरा स्थगित केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवर याबाबतची माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होता.
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रभारी मुख्य कार्यकारी निक हॉ्रले यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचा दौरा धोकादाक आहे व  आम्हाला हे अमान्य आहे. दक्षिण आफ्रिका कोरोनाच्या नव्या लाटेतून जात आहे. त्यामुळे तज्ज्ञांशी व्यापक चर्चा केल्यानंतर आमच्या हे लक्षात आले आहे की, यावेळी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी हा दौरा सुरक्षेच्या दृष्टीने जोखीमीचा असल्याने तो आम्हाला अमान्य आहे. याअगोदर इंग्लंडनेही दक्षिण आफ्रिकेचा आपला दौरा रद्द केला होता. ऑस्ट्रेलियाने याअगोदर बांगलादेशचाही आपला दौरा रद्द केला होता. ऑस्ट्रेलियाने या दोन्ही देशांच्या दौर्यादची नवीन तारीख आतापर्यंत घोषित केलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Zoom call with goat गमतीगमतीत केली 50 लाखांची कमाई