न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू हॅली जेन्सेनने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू निकोला हॅंकॉसह गेल्या आठवड्यात लग्न केलं. हेले बिग बॅश लीगच्या पहिल्या आणि द्वितीय सीझनमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळली होती. आता तिसऱ्या सीझनमध्ये ती मेलबर्न रेनेगड्सच्या वतीने खेळत आहे. तिथेच निकोला ऑस्ट्रेलियन टी-20 लीगमध्ये टीम ग्रीनसाठी खेळते. मेलबर्न स्टार्सने ट्विटरवर त्या दोघांच्या लग्नाचा फोटो टाकून अभिनंदन केलं.
जेन्सेनला व्हिक्टोरिया महिला प्रीमियर क्रिकेट टूर्नामेंट 2017-18 मध्ये सर्वोत्तम खेळाडू निवडलं गेलं होत. तिने 2014 मध्ये व्हाईट फर्न्ससाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होत आणि मेलबर्न क्रिकेट क्लबसाठी शतक बनविणारी पहिली महिला खेळाडू बनली. याशिवाय हँकॉकने महिला बिग बॅश लीगच्या 14 सामन्यात 19.92 सरासरीने 13 बळी घेतल्या. ती लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारी दुसरी खेळाडू आहे. न्यूझीलंडमध्ये समलॅंगिक विवाह ऑगस्ट 2013 पासून वैध आहे.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाची कर्णधार डॅन व्हॅन निकर्कने तिच्या सहकारी मॅरिजान कॅपशी विवाह केलं होत.