आशिया कप 2023 च्या सुपर-4 फेरीत पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर बांगलादेशने 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे पाकिस्तान संघाने 39.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले आणि मोठा विजय नोंदवला. या सामन्यानंतर कर्णधार बाबर आझमच्या नावावर एक मोठी उपलब्धी नोंदवण्यात आली आहे.
पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमने बुधवारी बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात कर्णधार म्हणून 2000 वनडे धावा पूर्ण करून टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीला मागे टाकले.
विराट कोहलीला मागे टाकत बाबर आझमने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला. कोहलीने आपल्या ३६व्या डावात, तर बाबरने 31व्या डावात ही कामगिरी केली.
एबी डिव्हिलियर्स या यादीत तिसऱ्या स्थानावर
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 47 डावांमध्ये 2000 वनडे धावा केल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध बाबर जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. कर्णधार बाबर 22 चेंडूत केवळ 17 धावा करून बाद झाला.