Festival Posters

बीसीसीआयच्या प्रशासकीय पदाचा रामचंद्र यांनी दिला राजीनामा

Webdunia
गुरूवार, 1 जून 2017 (16:52 IST)
रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर 4 जणांची प्रशासकीय समिती नियुक्त केली होती. रामचंद्र गुहा या समितीवर होते.
 
लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची बीसीसीआयची तयारी नसल्याने यावर्षी 30 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी प्रशासकीय समितीची नियुक्ती केली. कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख आहेत. माजी क्रिकेटपटू डायना इडुलजी, विक्रम लिमये, विनोद राय आणि रामचंद्र गुहा या चौघांची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केली होती.
 
एका राज्य, एक मत ही शिफारस लागू करण्यात विनोद राय समिती यशस्वी ठरलेली नाही. अजूनही बीसीसीआयमध्ये लोढा समितीच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. आयसीसीकडून मिळणा-या महसूलातही मोठी कपात झाली आहे त्यावरुन बीसीसीआय पदाधिकारी आणि प्रशासकीय समितीमध्ये मतभेद निमार्ण झाले आहेत. मात्र, व्यक्तीगत कारणांसाठी आपण राजनीमा देत असल्याचे गुहा यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यादरम्यान या गाण्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संतप्त

दुखापतग्रस्त अथर्व अंकोलेकरच्या जागी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी क्रिश भगतला संघात स्थान

विनोद कांबळीच्या आरोग्याला मोठा धोका; माजी भारतीय क्रिकेटपटू आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार

RCB vs LSG: बंगळूरने लखनौला ५ गडी राखून सहज पराभूत केले

पुढील लेख
Show comments