Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोलंदाज धवल कुलकर्णीने विजयासोबतच आपल्या १६ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला निरोप दिला

Webdunia
शुक्रवार, 15 मार्च 2024 (09:40 IST)
अंतिम फेरीत अजिंक्य रहाणेच्या संघाने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला आणि या विजयासह मुंबईचा अनुभवी खेळाडू निवृत्त झाला. स्टार गोलंदाज धवल कुलकर्णीने विजयासोबतच आपल्या १६ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला निरोप दिला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे फायनलची शेवटची विकेट घेत कुलकर्णीने विदर्भाचा डाव गुंडाळला. मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून धवलचा विशेष गौरव करण्यात आला. कुटुंबियांच्या उपस्थितीत क्रिकेटमधून निवृत्त होत असणारा धवल भावनिक झालेला पाहायला मिळाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या खास मित्रासाठी, मुंबईचा योद्धा अशी पोस्ट लिहिली.
 
रणजी करंडक फायनलच्या पाचव्या दिवसातील १३५ व्या षटकातील तिसरा चेंडू धवलच्या कारकिर्दीतील शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवर त्याने उमेश यादवला बोल्ड केले.  ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विदर्भाचा दुसरा डावा ३६८ धावांवर गडगडला. मुंबईकडून तनुष कोटियनने ४, तुषार देशपांडे व मुशीर खान यांनी प्रत्येकी २, तर शाम्स मुलानी व धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. धवलने अंतिम फेरीत एकूण चार विकेट घेतल्या. या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने चार सामन्यांच्या ८ डावात एकूण ११ बळी घेतले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

बांगलादेशविरुद्ध चेपॉकच्या मैदानात केएल राहुल नक्की येणार, कर्णधाराकडून हिरवा सिग्नल

आयसीसी कडून महिलाT20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर

IND vs BAN सिरीज पूर्वी गंभीर ने घेतली या खेळाडूची मदत

Duleep Trophy: प्रथमसिंग आणि टिळक वर्मा यांनी शतके झळकावली

IPL 2025:धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघ घेऊ शकतो मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments