आयपीएल 2021 मध्ये आज आणखी एकडबल हेडर सामना खेळला जात आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स दिवसाच्या पहिल्या सामन्यात आमनेसामने आहेत. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केकेआरसाठी पहिले षटक अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने संपले. सलग दोन चौकार मारल्यानंतर रिव्ह्यू घेऊन शुभमन गिल एलबीडब्ल्यूमधून बचावला पण शेवटच्या चेंडूवर रायडूने धावबाद केले. पाच चेंडूत 9 धावा केल्यावर गिल बाद झाला.
शुभमन गिलने दमदार सुरुवात केली आहे. त्याने दीपकच्या पहिल्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावले.व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने कोलकाताला डावाची सलामी दिली.
कोलकाता नाईट रायडर्स:
शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (क), दिनेश कार्तिक (wk), आंद्रे रसेल, सुनील नारायण,लॉकी फर्ग्युसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती
चेन्नई सुपर किंग्ज:
ऋतूराज गायकवाड,फाफ डु प्लेसिस,मोईन अली,सुरेश रैना,अंबाती रायुडू,एमएस धोनी (c & wk), रवींद्र जडेजा,सॅम करन,शार्दुल ठाकूर,दीपक चाहर,जोश हेजलवूड
कोलकाता संघाने या सामन्यासाठी कोणताही बदल केलेला नाही. चेन्नईने ड्वेन ब्राव्होला विश्रांती दिली आणि त्याच्या जागी सॅम करनला घेतले.
केकेआर आणि सीएसके या दोघांनी दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली आहे. धोनीचे चेन्नईतील 9 सामन्यांतून 14 गुण असून तो सध्या दुसऱ्या स्थानावर आहे, तर कोलकाताचा संघ 9 सामन्यांतून आठ गुणांसह रन रेटच्या आधारावर चौथ्या स्थानावर आहे. जर चेन्नईने आज विजय मिळवला तर तो पहिल्या स्थानावर जाईल, तर केकेआर जिंकल्यास तो 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर जाईल.