suvichar

गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

Webdunia
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (08:50 IST)
टीम इंडियाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एका रेस्टोरंट-बारने त्यांच्या पबच्या जाहिरातीसाठी गौतम गंभीर हे नाव वापरलं होतं, ते हटवण्याची मागणी गंभीरने याचिकेद्वारे केली होती. मात्र कोर्टाने त्याला नकार दिला.
 
त्याचे कारण म्हणजे त्या पबच्या मालकाचे नावही गौतम गंभीरच आहे. त्यामुळे कोर्टाने ते नाव न वापरण्याची गंभीरची मागणी फेटाळली.
 
नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण?
 
पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाक परिसरात डीएसपी आणि कंपनीचे दोन पब आहेत. घुंघरू आणि हवालात अशी त्यांची नावं आहेत. पब मालकाचंही नाव गौतम गंभीर आहे. या पबची जाहिरात ‘बाय गौतम गंभीर’ अशी केली जाते.
 
मात्र हे पब आपलेच आहेत अशी लोकांची धारणा होत आहे, त्यामुळे गौतम गंभीर हे नाव हटवावं, अशी मागणी क्रिकेटपटू गंभीरने केली होती. या नावामुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचेही गंभीरने याचिकेत म्हटलं होतं. पण कंपनीने कोर्टात दावा केला की, मालकाचं नावही गौतम गंभीर असल्यामुळे आम्ही तेच वापरत आहोत. कोर्टाने कंपनीचं म्हणणं मान्य करत, क्रिकेटपटू गंभीरला झटका देत, त्याची याचिका फेटाळली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

इंग्लंडने भारताला ५६ धावांनी हरवून मालिका ४-० ने जिंकली आणि पुन्हा अव्वल स्थान पटकावले

IND vs ENG: इंग्लंडने भारताविरुद्धची आपली पहिली २+ सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली

भारत व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंडचे लक्ष्य अव्वल स्थान पटकावण्याचे असेल

झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशला पराभूत करून मोठा उलटफेर घडवला

सलग पाच टी-२० सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम

पुढील लेख
Show comments