Festival Posters

आयसीसीने हरिस रौफवर दोन सामन्यांची बंदी घातली, सूर्यकुमार यादवला दंड

Webdunia
बुधवार, 5 नोव्हेंबर 2025 (14:10 IST)

टीम इंडियाने आशिया कप 2025 चे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात पाकिस्तानला 4 विकेट्सने हरवून भारताने आशिया कप ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण तीन सामने खेळले गेले आणि तिन्ही वेळा टीम इंडियाने विजय मिळवला.

ALSO READ: नोव्हेंबरमध्ये या तारखेला होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

आशिया कप 2025 मध्ये जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला तेव्हा तिथे काही ना काही वाद दिसून आला. आता आयसीसीने पहिल्यांदाच या प्रकरणात आपला निर्णय दिला आहे. आयसीसीने 14 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबरच्या सामन्यांसाठी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफला शिक्षा दिली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 14 सप्टेंबरच्या सामन्यासाठी हरीस रौफला दोन डिमेरिट पॉइंट्स दिले आहेत, तर 14 सप्टेंबरच्या सामन्यासाठी दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले आहेत. यामुळे हरीसला 24 महिन्यांच्या कालावधीत चार डिमेरिट पॉइंट्स मिळाले आहेत आणि त्याच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

ALSO READ: भारतीय खेळाडूचा रस्ते अपघातात मृत्यू

हरीस आता पुढील दोन सामन्यांसाठी पाकिस्तान संघाबाहेर असेल. 14 सप्टेंबरच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला 30% दंड ठोठावण्यात आला आहे. सूर्याला कलम 2.21चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले. त्याला केवळ त्याच्या सामन्याच्या फीच्या 30% दंड ठोठावण्यात आला नाही तर दोन डिमेरिट पॉइंट्सही देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानलाही याच कलमाअंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे

भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर कलम 2.6 अंतर्गत आरोप ठेवण्यात आला होता, जो अश्लील किंवा आक्षेपार्ह हावभावांशी संबंधित आहे. तथापि, चौकशीनंतर तो दोषी आढळला नाही आणि त्याला शिक्षा देण्यात आली नाही.

ALSO READ: विराटच्या कोहलीच्या त्या एका पोस्टने खळबळ
28
सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन खेळाडूंना शिक्षा झाली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (भारत) याला कलम 2.21 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि त्याला अधिकृत इशारा आणि एक डिमेरिट पॉइंट मिळाला. त्याने दंड स्वीकारला, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती. हरिस रौफला पुन्हा त्याच कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले. रिची रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत त्याला त्याच्या मॅच फीच्या 30 टक्के दंड आणि दोन अतिरिक्त डिमेरिट पॉइंट देण्यात आले.

Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

First Test: IND vs SA दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, कुलदीपने कर्णधार बावुमाला बाद केले

आयपीएल २०२६ चा ऑक्शन जाहीर, या दिवशी परदेशी भूमीवर खेळाडूंवर बोली लावली जाणार

पुणे RCB चे नवे घर बनू शकते; 'IPL 2026' ची तयारी जोरात सुरू

PAK vs SL: इस्लामाबादमधील बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेच्या संघात घबराट पसरली; ८ खेळाडू पाकिस्तान सोडून जाणार, दुसरा एकदिवसीय सामना रद्द होणार?

पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला

पुढील लेख