आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी पुरुष आणि महिला क्रिकेटसाठी 2022 सालातील T20I संघाची घोषणा केली. या संघात जगभरातील खेळाडूंचा समावेश आहे ज्यांनी गेल्या वर्षी बॉल आणि बॅटने केलेल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. ICC ने पुरुष आणि महिला दोन्ही संघात 11 खेळाडूंची निवड केली असून भारतातील प्रत्येकी तीन खेळाडू दोन्ही संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.
पुरुषांच्या T20 संघात भारताचे तीन, इंग्लंड आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन आणि न्यूझीलंड, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि आयर्लंडचे प्रत्येकी एक खेळाडू आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाचे नेतृत्व करणाऱ्या जोस बटलरची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
विराटने स्वत: टी-20 फॉरमॅटमध्ये शतक करण्याचा विचार कधीच केला नव्हता, पण गेल्या वर्षी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 122 धावांची खेळी केली आणि तीन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधले हे त्याचे पहिले शतक होते. या स्पर्धेत त्याने 276 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता.
यानंतर विराटने टी-20 विश्वचषकात आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आणि स्पर्धेत 296 धावा केल्या. विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. विराटने या स्पर्धेत चार अर्धशतके झळकावली. त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावा केल्या आणि भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्याने त्याला त्याची सर्वोत्कृष्ट टी-20 इनिंग असल्याचे देखील सांगितले.
2022 सालचा ICC पुरूष संघ:
जोस बटलर (c-wk), मोहम्मद रिझवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पंड्या, सॅम करण, वानिंदू हसरंगा, हरिस रौफ, जोशुआ लिटल.
2022 साठीचा ICC महिला संघ:
स्मृती मंधाना, बेथ मुनी, सोफी डेव्हाईन (c), ऍश गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, निदा दार, दीप्ती शर्मा, रिचा घोष (wk), सोफी एक्लेस्टोन, इनोका रणवीरा, रेणुका सिंग.