ICC ने मंगळवारी ICC ODI World Cup 2023 चे वेळापत्रक जाहीर केले. मुंबईतील लोअर परेल येथील सेंट रेगिस एस्टर बॉलरूममध्ये दुपारी 12 वाजता आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन भारत करणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. ICC ने नुकतेच 12 शहरांमध्ये होणार्या सर्व विश्वचषक सामन्यांची (ICC World Cup 2023 Schedule) ठिकाणे जाहीर केली आहेत.
भारत आपले सामने कधी आणि कुठे खेळणार
8 ऑक्टोबर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - चेन्नई
11 ऑक्टोबर, भारत विरुद्ध अफगाणिस्तान - दिल्ली
15 ऑक्टोबर, भारत विरुद्ध पाकिस्तान - अहमदाबाद
19 ऑक्टोबर भारत विरुद्ध बांगलादेश - पुणे
22 ऑक्टोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड - धर्मशाला
29 ऑक्टोबर भारत विरुद्ध इंग्लंड - लखनौ
2 नोव्हेंबर भारत विरुद्ध क्वालिफायर - मुंबई
5 नोव्हेंबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - कोलकाता
11 नोव्हेंबर भारत विरुद्ध क्वालिफायर - बेंगळुरू
15 नोव्हेंबर - पहिली उपांत्य फेरी, मुंबई
16 नवंबर - दुसरी उपांत्य फेरी, कोलकाता
19 नवंबर - फायनल, अहमदाबाद