India vs Australia (IND vs AUS) 1st T20i: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोहाली येथे पहिला T20 खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा चार गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 30 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. कॅमेरून ग्रीनने 30 चेंडूत 61 धावा केल्या आणि मॅथ्यू वेडने 21 चेंडूत 45 धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना 23 सप्टेंबर रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.