इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला एक कसोटी सामना खेळायचा आहे, मात्र या सामन्यासाठी योग्य संघ निवडणे कठीण होत आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोनाची लागण झाल्यानंतर संघाबाहेर झाला असून संघाची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती आहे. आता प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार बुमराह यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान सलामीची जोडी निवडण्याचे असेल. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजामध्ये जडेजा किंवा अश्विन यापैकी एकाची निवड करणेही कठीण होणार आहे.
इंग्लंडच्या कठीण परिस्थितीत सलामीच्या जोडीचे महत्त्व वाढते. या मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये भारताच्या आघाडीचे कारण म्हणजे सलामीची जोडी. रोहित आणि राहुल यांनी मिळून प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात केली होती आणि दोघेही भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे होते. या मालिकेत दोघेही फलंदाज नाहीत. अशा स्थितीत गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे.पण मयंकला संधी देण्या ऐवजी प्रशिक्षक द्रविड पुजारासोबत डावाची सुरुवात करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सामन्यात भारताला चार वेगवान गोलंदाजी पर्यायांसह जायचे आहे. शार्दुल ठाकूर वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून खेळणार आहे. त्याचबरोबर कर्णधार जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे अन्य दोन वेगवान गोलंदाज असतील.
इंग्लंड संघाकडून 11 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत. विकेटकीपर बेन फोकस कोरोनामुळे संघाबाहेर गेला असून त्याच्या सॅम बिलिंग्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड संघ-
अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
भारताच्या संभाव्य संघ-
शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार,विकेटकिपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.