भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज माउंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाने वाहून गेला होता. त्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.आज न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याला या सामन्यात पाहण्यासाठी उत्सुक होते, मात्र उमरानचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. संजू सॅमसनने आयपीएलच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली .संजूला संघात स्थान
मिळाला नाही.
दोन्ही संघाचे प्लेइंग 11 -
भारत : ईशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (क), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.