Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs SA: कसोटीत नाणेफेक जिंकण्याचा विराट कोहलीचा नवा विक्रम

IND vs SA: Virat Kohli's new record for winning a toss in a TestIND vs SA: कसोटीत नाणेफेक जिंकण्याचा विराट कोहलीचा नवा विक्रमMarathi Cricket News  In Webdunia Marathi
, मंगळवार, 11 जानेवारी 2022 (16:02 IST)
केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हे  नाणेफेक जिंकून विराट कोहलीने एका खास बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉची बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाणेफेक जिंकण्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. विराट कोहलीने कसोटी सामन्यात 31व्यांदा नाणेफेक जिंकले  असून अशा प्रकारे त्याने वॉची बरोबरी केली आहे.
ग्रॅमी स्मिथने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत 60 कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी  46 कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी त्यांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत कसोटी सामन्यांमध्ये 37-37 वेळा नाणेफेक जिंकली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड आणि सध्याचा इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट यांनी कसोटी सामन्यांमध्ये 35-35 वेळा नाणेफेक जिंकली आहे. अशाप्रकारे विराट 30 हून अधिक वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत केवळ सातवे  खेळाडू ठरले  आहे.
 
एक खेळाडू म्हणून विराटच्या कारकिर्दीतील हा 99 वा कसोटी सामना आहे. कर्णधार म्हणून हा त्यांचा  68 वा कसोटी सामना आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 40 कसोटी सामने जिंकले आहेत, तर 16 वेळा संघाचा पराभव झाला आहे, तर 11 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत घाई घाईने निर्णय घेणार नाही : पेडणेकर