Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs SL: जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन, वनडे मालिकेत खेळणार

Webdunia
मंगळवार, 3 जानेवारी 2023 (17:25 IST)
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराहचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडला होता. टी-२० विश्वचषकातही तो टीम इंडियाचा भाग नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहचा भारतीय संघात समावेश होणे भारतासाठी आनंदाची बातमी आहे.
 
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर 2022 पासून टीम इंडियातून बाहेर होता. दुखापतीतून सावरल्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. जसप्रीत बुमराहला नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सराव केल्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले असून तो लवकरच भारतीय संघात सामील होणार आहे.
 
29 वर्षीय जसप्रीत बुमराहने 25 सप्टेंबर रोजी भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो भारतीय संघाचा भाग होता. त्याच वेळी त्याने 14 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.
 
वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, बुमराह टी-20 मालिकेत खेळणार नाही.
 
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघः 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचे वेळापत्रक
1ली वनडे, 10 जानेवारी, गुवाहाटी
दुसरी वनडे, 12 जानेवारी, कोलकाता
तिसरी वनडे, 15 जानेवारी, तिरुवनंतपुरम
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

Legends League Cricket : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे तपशील जाणून घ्या

दुलीप ट्रॉफीमध्ये शून्यावर बाद झालेला श्रेयस अय्यर पुन्हा फ्लॉप झाला

पुढील लेख
Show comments