भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 9 गडी गमावून 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 42.2 षटकांत केवळ 208 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला.
श्रीलंकेने हा सामना 32 धावांनी जिंकून मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी 2 ऑगस्टला खेळवण्यात आलेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता. आता भारताची नजर मालिका बरोबरीत सोडवण्याकडे असेल. तिसरा सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.
आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघ विखुरला.रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 97 धावांची मोठी भागीदारी झाली.
या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा निराशा केली. केवळ 14 धावांची इनिंग खेळून तो बाद झाला.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारताला 241 धावांचे लक्ष्य दिले. अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 50 षटकांत नऊ गडी गमावून 240 धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने 10 षटकांत 30 धावांत सर्वाधिक तीन बळी घेतले,