भारतीय संघाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा सहा विकेट्सनी पराभव करत जबरदस्त पुनरागमन केले आहे. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सेनेने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विश्वचषकातील पहिला विजय मिळवला. याआधी टीम इंडियाला न्यूझीलंडकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
अ गटातील गुणतालिकेत भारतीय संघ या विजयासह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात दोन गुण आहेत. तथापि, त्याचा निव्वळ धावगती -1.217 आहे. आता भारतीय संघाला 9 ऑक्टोबरला याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. न्यूझीलंड अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा संघ शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.
रविवारी झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 105 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 18.5 षटकांत चार गडी गमावून 108 धावा केल्या आणि सामना सहा विकेट राखून जिंकला.