Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयसीसी कसोटी मानांकन : भारत आणि कर्णधार कोहली क्रवारीत अव्वलस्थानी कायम

Webdunia
मंगळवार, 22 जानेवारी 2019 (14:43 IST)
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिला विजय नोंदविणार्‍या भारताचा संघ व कर्णधार विराट कोहली या दोघांनीही हीर झालेल्या आयसीसीच कसोटी क्रमवारीत आपले अग्रस्थान अबाधित ठेवत आणखी मजबूत केले आहे.
 
भारताचे 116 झाले गुण असून भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी संघ बनला आहे. तर कर्णधार कोहली फलंदाजांच्या मानांकनात 922 गुणांसह दुसर्‍या स्थानी असलेल्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विलिम्सनच्या (897 गुण) 25 गुणांनी पुढे आहे.
 
ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा तिसर्‍या स्थानी कायम आहे. तर युवा ऋषभ पंत आपल्या कारकिर्दीतील आतार्पंतच्या सर्वोच्च स्थानी म्हणजेच 17 व्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये कगिसो रबाडा आतार्पंतही क्रमवारीत अव्वल आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 711 गुणांसह 15 व्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडला आपले तिसरे स्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडीजविरूध्द बुधवारपासून सुरू होणार्‍या तीन सामन्यांची मालिका जिंकावी लागेल. तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे देखील त्यानंतर एक दिवसाने सुरू होणार्‍या दोन सामन्यांच्या मालिकेत महत्त्वपूर्ण गुण मिळविण्यासाठी तत्पर असतील. इंग्लंड जर 3-0 ने जिंकू शकला तर त्यांचे 109 गुण होतील. मात्र, तरीही त्यांचे स्थान भारत आणि दक्षिण आफ्रिका याच्यानंतरच असेल. 
 
जर मालिकेचा कोणताच निकाल नाही आला तर वेस्ट इंडीज आठव्या स्थानी असेल. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील जय-पराभव यापैकी कोणताही निकाल दोन्ही संघांना अनुक्रमे पाचव्या आणि आठव्या स्थानी ठेवेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

युझवेंद्र चहलने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खास 'शतक' पूर्ण करून मोठा पराक्रम केला

श्रीलंकेने 10 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकला

Duleep Trophy 2024: बीसीसीआयने दुसऱ्या फेरीसाठी संघांची घोषणा केली,गिल आणि केएलच्या जागी या खेळाडूंचा समावेश

DPL 2024 : ईस्ट दिल्ली रायडर्सने रोमांचक सामन्यात दिल्ली प्रीमियर लीग जिंकली

AFG vs NZ: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील शानदार सामना सोमवारपासून सुरू

पुढील लेख
Show comments