भारतऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना असणार आहे. सध्या दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. तिसर्या- कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची चांगली संधी होती.
पण ऋषभ पंत, आर. अश्विन आणि हनुमा विहारीने ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवत कसोटी अनिर्णीत राखली. ब्रिस्बेनच्या मैदानावरील आतार्पंतचा भारताचा इतिहास बघितला तर आकडेवारी फारशी उत्साहवर्धक नाही. या मैदानावर भारतीय संघाला आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. पण तो इतिहास आहे, आणि या ताज्या नव्या दमाच्या भारतीय संघात तो इतिहास बदलण्याची क्षमता आहे.
खेळपट्टी
ब्रिस्बेनची खेळपट्टी ही संतुलित समजली जाते. येथे फलंदाज व गोलंदाज दोघांना यश मिळवण्याची समान संधी असते. या खेळपट्टीवर उसळते चेंडू ओळखणे फलंदाजाला फारसे जड जात नाही. फिरकी गोलंदाजालाही खेळपट्टीकडून साथ मिळते.
भारतीय संघाचे रेकॉर्ड
गाबा ब्रिस्बेनच्या मैदानावरील टीम इंडियाचे रेकॉर्ड फार उत्साहवर्धक नाही. गाबा ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. मागच्या काही वर्षात ताज्या दमाच्या टीम इंडियाने अनेक मैदानांवरील पूर्व इतिहासाचे आकडे बदलले आहेत. त्यामुळे याठिकाणी सुद्धा भारतीय संघ ऐतिहासिक विजयाची नोंद करू शकतो.
ऑस्ट्रेलिन संघाचे रेकॉर्ड
गाबा ब्रिस्बेन क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड खूपच चांगले आहे. ऑस्ट्रेलियन संघ आतापर्यंत या मैदानावर 55 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्यांना 33 कसोटींमध्ये विजय तर फक्त आठ कसोटी सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. या मैदानावर 1988 सालापासून ऑस्ट्रेलियाचा एकदाही पराभव झालेला नाही. 1988 साली वेस्ट इंडीजच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.