Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रीती झिंटाची धमकी, इंदूरला येणार नाही

IPL 2018
मध्य प्रदेशातील इंदूर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे होम ग्राउंड आहे. संघाची को ऑनर प्रीती झिंटा मागील वर्षी आपल्या संघासह या शहरात आली होती. या वर्षीदेखील इंदूरला पोहचून प्रीतीने पत्रकारांशी चर्चा केली. त्यादरम्यान तिला विचारण्यात आले की इंदूरमध्ये तिकिट इतके महाग का? तर तिने बेजबाबदारपणे उत्तर दिले की मोहालीहून इंदूर येण्याचे भाडे वाढले आणि पेट्रोलच किंमतदेखील.
 
एवढेच नव्हे तर प्रीतीने म्हटले की जर तिच्या संघाला या ग्राउंडवर समर्थन मिळाले नाही तर ती येथे येणार नाही. प्रीती म्हणाली की मागल्या वर्षी इंदूर शहरात चांगला प्रतिसाद बघायला मिळाला पण विचित्र बाब म्हणजे येथील लोकं दुसर्‍या संघाला प्रोत्साहित करतात जेव्हा की हे पंजाबचे होम ग्राउंड आहे.
 
प्रीती म्हणाली दर्शक होम टीमला प्रोत्साहित करतील तर टीमचा आत्मविश्वासही वाढेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सहा महिन्यांनी पिकनिक स्पॉटवर तरुण-तरुणीचे सापळे सापडले