आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात मुंबईचा संघ 20.55 कोटी रुपयांसह उतरला. या संघात आधीच 16 खेळाडू होते. मात्र, किरॉन पोलार्डच्या निवृत्तीनंतर मुंबईला वेगवान गोलंदाजी तसेच डेथ ओव्हर्समध्ये बॅटने वेगवान धावा करू शकणाऱ्या खेळाडूची गरज होती. याशिवाय फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करू शकणाऱ्या खेळाडूचीही मुंबईला गरज होती.
ऑस्ट्रेलियन स्फोटक अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला विकत घेऊन मुंबईने पोलार्डची जागा शोधली. त्याचवेळी पियुष चावला आणि शम्स मुलाणी यांना खरेदी करून मुंबईने फिरकीपटूंच्या गरजाही पूर्ण केल्या. आयपीएल 2023 साठी मुंबईचा संघ खूप मजबूत दिसत आहे.
यावेळी मुंबईने मिनी लिलावात आणखी अनेक दिग्गज खेळाडू विकत घेतले आणि आता हा संघ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि संतुलित दिसत आहे.
मुंबई : रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ,आकाश मधवली.
मिनी लिलावात खरेदी केलेले खेळाडू: कॅमेरॉन ग्रीन (रु. 17.5 कोटी), जे रिचर्डसन (रु. 1.5 कोटी), पियुष चावला (रु. 50 लाख), डुआने जॅनसेन (रु. 20 लाख), विष्णू विनोद (रु. 20 लाख), शम्स मुलानी (रु. 20 लाख), मेहल वढेरा (रु. 20 लाख), राघव गोयल (रु. 20 लाख).
वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या हाती असेल. त्याचबरोबर मुंबईची फलंदाजी चांगलीच भक्कम झाली आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्याशिवाय मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड्स आणि कॅमेरून ग्रीन असतील. ब्रेविस, पियुष चावला, मुलाणी यांच्यावर फिरकीची भिस्त असेल. अशा स्थितीत संघ सहाव्यांदा विजेतेपदाचा दावा करणार आहे.