Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mukesh Kumar Wedding: भारतीय संघाच्या या खेळाडूने लग्नगाठ बांधली

Webdunia
बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (09:25 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार मंगळवारी रात्री विवाहबद्ध झाले .यूपीच्या गोरखपूरमधील एका हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. मुकेश कुमार यांनी सारणच्या बनियापूर बेरूई गावात राहणाऱ्या दिव्या सिंगला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. 

लग्नामुळे मुकेश मंगळवारी गुवाहाटीमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळला नव्हता. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, मुकेश 4 डिसेंबरला रायपूरमध्ये होणाऱ्या चौथ्या टी-20 सामना खेळणार.
 
मुकेशच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटीही गोरखपूरला पोहोचले होते.
 
क्रिकेटर मुकेश कुमारच्या लग्नाच्या मिरवणुकीचा भाग म्हणून मंगळवारी संध्याकाळी गोपालगंजमधील लोक मोठ्या संख्येने गोरखपूरला त्यांच्या गावातून निघाले होते. त्यात मुकेश कुमारचे अनेक बालपणीचे क्रिकेटर मित्र आहेत.
 
मुकेश कुमार यांच्या लग्नापूर्वीच्या हळदी समारंभाचा व्हिडिओही समोर आला आहे. क्रिकेटपटू मुकेश कुमार आणि त्याची भावी पत्नी दिव्या यांचा लग्नाआधीच्या हळदी विधीच्या वेळी होणाऱ्या गाण्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओही त्याच्या काही मित्रांनी इंटरनेट मीडियावर शेअर केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत सध्या क्रिकेटर मुकेश कुमारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. गोपालगंजच्या सदर ब्लॉकमधील काकरकुंड गावात राहणारे मृत काशिनाथ सिंह आणि मालती देवी यांचा मुलगा मुकेश कुमार यांचे वडील कोलकाता येथे टॅक्सी चालक म्हणून काम करायचे. कठोर परिश्रम आणि समर्पणाने, क्रिकेटर मुकेश कुमार आज क्रिकेट आणि गावातील गल्लीबोळातून उच्चस्तरीय खेळाडू बनले आहेत.
 
गेल्या वर्षी आयपीएल लिलावात मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यानंतर मुकेश कुमारची आंतरराष्ट्रीय संघात निवड झाली.
 
श्रीलंका यांच्यातील घरच्या टी-20 मालिकेत मुकेश कुमारने चांगली कामगिरी करत दोन विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पाकिस्तान दौऱ्यासाठी बीसीसीआयला भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही?

IND vs SA: संजू सॅमसन T20 मध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला

भारताने दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांनी विजय मिळवला

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

पुढील लेख
Show comments