Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेन वॉर्न : निधनाच्या 12 तासांपूर्वी ट्वीट करून व्यक्त केलं होतं हे दुःख

Shane Warne: The sadness was expressed by tweeting 12 hours before his death शेन वॉर्न : निधनाच्या 12 तासांपूर्वी ट्वीट करून व्यक्त केलं होतं हे दुःखMarathi Cricket News In Webdunia Marathi
, शुक्रवार, 4 मार्च 2022 (20:09 IST)
ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न यांचं निधन झालंय. थायलंडमध्ये कोह समुईमध्ये वॉर्न यांचं निधन झालंय.
शेन वॉर्न यांच्या निधनाबद्दल सांगणाऱ्या निवेदनात म्हटलंय, "शेन त्यांच्या बंगल्यात बेशुद्ध आढळले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना शुद्धीवर आणता आलं नाही. या कठीण काळामध्ये कुटुंबाने आपल्याला काही खासगी क्षण मिळावेत अशी विनंती केली आहे. याबद्दलची अधिक माहिती आम्ही काही वेळाने देऊ "
 
शेन वॉर्न शेवटचं ट्वीट
शेन वॉर्न यांनी आज सकाळीच ट्वीट करत क्रिकेटर रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती. या ट्वीटमध्ये वॉर्न यांनी म्हटलं होतं, "रॉड मार्श यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटलं. ते आमच्या खेळातले लिजंड होते आणि अनेक तरूण मुलामुलींसाठी प्रेरणास्थान होते. रॉड यांना क्रिकेटविषयी प्रचंड आस्था होती. आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिलं."
रॉडनी उर्फ रॉड मार्श हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होते. ऑस्ट्रेलियन संघाचे ते विकेटकीपर होते. 70 आणि 80च्या दशकात ते ऑस्ट्रेलियन संघात खेळत.
74 वर्षांच्या मार्श यांचं 4 मार्चला ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंडमध्ये निधन झालं

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन