rashifal-2026

सामन्याआधी बदल स्टेडियमचं नाव

Webdunia
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (11:57 IST)
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी अर्थात आज लखनऊमध्ये संध्याकाळी दुसरी टी-२० मॅच होणार आहे. पण त्याआधी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं इथल्या स्टेडियमचं नाव बदललं आहे. इकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं नाव असलेल्या या स्टेडियमचं नाव आता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं ठेवण्यात आलंय. शहर नियोजन खात्याचे मुख्य सचिव नितीन रमेश गोकर्ण यांनी ही माहिती दिली आहे.
 
अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना इकना स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. या स्टेडियमचं उद्घाटन २०१७ साली करण्यात आलं होतं. तब्बल २४ वर्षानंतर लखनऊमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आगमन होणार आहे. याआधी १९९४ साली श्रीलंकेविरुद्ध लखनऊच्या केडी सिंह बाबू स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळवण्यात आली होती. यानंतर सगळ्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलच्या मॅच कानपूरमध्ये खेळवण्यात आल्या. या नव्या मैदानात ५० हजार प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेऊ शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

दारूच्या नशेत माजी भारतीय क्रिकेटपटूची एसयूव्हीला धडक, वडोदरा येथे अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने क्रिकेट जगतात शोककळा पसरली; सचिन तेंडुलकर म्हणाले, "आपण एक समर्पित नेता गमावला''

केएल राहुलने क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याबद्दल स्पष्टीकरण दिले

गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन धावांनी पराभव केला

टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, शाई होप नेतृत्व करणार

पुढील लेख
Show comments