Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्यकुमार यादवला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठी निवडण्यात आले, 2022 मधील कामगिरी केली

Suryakumar Yadav
, गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (21:51 IST)
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 च्या वार्षिक पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड केली आहे. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचे नाव टी-20 मध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. त्याच्याशिवाय इतर 3 खेळाडूंनाही शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. एकाही भारतीय खेळाडूला वनडेमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. दोन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा एक एक खेळाडू आहे.
   
सूर्यकुमार यादवशिवाय झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, इंग्लंडचा सॅम कुरन आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यांना वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि वेस्ट इंडिजचा शाई होप यांना वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेला सिकंदर रझा हा एकमेव खेळाडू आहे.
 
सूर्यकुमार यादवची कामगिरी कशी आहे :-
सूर्यकुमारने 2022 मध्ये 31 टी-20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या होत्या. हे वर्ष त्याच्यासाठी छान गेले. एका वर्षात हजाराहून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. तो या वर्षी टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट तुफानी 187.43 राहिला. सूर्यकुमारने यावर्षी सर्वाधिक 68 षटकारही मारले आहेत. यावर्षी त्याच्या नावावर दोन शतके आणि नऊ अर्धशतके आहेत.
 
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान सूर्यकुमार यादवने सहा डावांत तीन अर्धशतके झळकावली होती. यादरम्यान त्याने 59.75 च्या सरासरीने आणि 189.68 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या. यावर्षी, सूर्यकुमार यादवने इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकावली आणि आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याने दिला हा सल्ला