Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी

Two years ago
नवी दिल्ली , मंगळवार, 7 एप्रिल 2020 (16:02 IST)
भारताचा कर्णधार विराट कोहली हा दोन वर्षांपासून शाकाहारी आहे, असे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण कोहली दोन वर्षांपासून शाकाहारी का बनला, हे मात्र तुम्हाला माहिती नसेल.

कोहली हा पंजाबी कुटुंबातील आहे. पंजाबी लोकही खाण्याचे शौकिन असतात, असे म्हटले जाते. दोन वर्षांपूर्वी कोहली देखील मांसाहार करायचा, पण सध्या दोन वर्षांपासून तो पूर्णपणे शाकाहारी झाला आहे.

याबाबत कोहलीने सांगितले की, ही गोष्ट आहे दक्षिण आफ्रिकेच्या   दौर्‍यातील. दोन वर्षांपूर्वी भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर   गेला होता. याबाबत कोहली म्हणाला की, जेव्हा दोन वर्षांपूर्वी आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेलो होतो तेव्हा माझी पाठ दुखत होती. माझ्या हाडांमधील कॅल्शियम कमी झालेले होते. माझे अंग दुखत होते. त्यामुळे मी रात्रभर झोपूही शकलो नव्हतो. दुसर्‍या दिवशी जेव्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली तेव्हा मला समजले की माझ्या   पोटामध्ये युरिन अ‍ॅसिड तयार होत होते. त्यानंतर मी वैद्यकीय  उपचार घेतले आणि त्यानंतर मी मांसाहार खाणे बंद केले.

कोहली पुढे म्हणाला की,  दोन वर्षांपूर्वी मी मांसाहार बंद केला. पण आता मला पूर्वीपेक्षा जास्त चांगले वाटत आहे. तंदुरुस्तीही चांगली वाढलेली आहे. त्यामुळे शाकाहारी असल्याचे काही फायदेही असतात. माझी पत्नी अनुष्का शर्मा देखील शाकाहारी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp ने घेतला मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा