Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

U19:भारत पाचव्यांदा चॅम्पियन बनला, फायनलमध्ये इंग्लंडवर चार विकेट्सनी मात

U19: India became champions for the fifth time
, रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (10:58 IST)
अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. यापूर्वी टीम इंडियाने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याचवेळी 2006, 2016 आणि 2020 मध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 44.5 षटकांत सर्वबाद 189 धावांवर आटोपला.
 
जेम्स रियूने सर्वाधिक 95 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून राज बावाने पाच आणि रवी कुमारने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने 47.4 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून निशांत सिंधूने नाबाद 50धावा केल्या. तर  शेख रशीदनेही 50 धावांची खेळी केली. दिनेश बाणाने 48 व्या षटकात सलग दोन षटकार मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
 
भारतीय संघ विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला. अंडर-19 मधील कोणताही संघ इतक्या वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. त्याचवेळी टीम इंडियाचा हा सलग चौथा अंतिम सामना ठरला. सर्वाधिक पाच विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही भारतीय संघाच्या नावावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता. या संघाने ग्रुप स्टेजपासून आतापर्यंत स्पर्धेतील आपले सर्व सामने जिंकले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लता मंगेशकर यांना आदरांजली: भारताचा आवाज हरपला