Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोहलीसमोर प्रश्न, सलामीला कोण?

virat kohali
कोलंबो , बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (09:10 IST)
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विक्रमी विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीसमोर दुसऱ्या कसोटीसाठी फलंदाजीचा क्रमाचा प्रश्न उभाआहे.
 
गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कोलंबोतील कसोटी सामन्यात कोणाला संघाबाहेर ठेवायचे आणि कोणाला संधी द्यायची? असा प्रश्न कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्यासमोर आहे.
 
शिखर धवन सुट्टीसाठी मेलबर्नला जाणार होता. पण, लोकेश राहुल आजारी पडल्याने त्याला बोलावण्यात आले. आता राहुल फिट झाला आहे. त्यामुळे धवन, की राहुल असा पेच संघव्यवस्थापनला पडला आहे. विराट म्हणाला की,  हा मोठा प्रश्न आहे. पण, कोणाला खेळवायचे, कोणाला नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. जो कोणी तिसरा खेळाडू असेल तो समजून जाईल, की संघव्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहीद खाकान अब्बासी हे पाकिस्ताचे नवीन पंतप्रधान