Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विरानुष्काचा फोटो वाईरल, ४४ मिनिटांत ६ लाखांहून अधिक लाइक्स

cricket news
अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच काही मिनिटांमध्ये तो व्हायरलही झाला. अनुष्का विराटला किस करत करत असताना विराटने तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला. अवघ्या ४४ मिनिटांच्या आत या फोटोला ६ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले.
 
दक्षिण आफ्रिकेची मालिका संपवून विराट नुकताच मुंबईला त्याच्या नवीन घरी परतला.अनुष्काही तिचे ‘सुई- धागा’ या सिनेमाचे चित्रीकरण संपवून मुंबईला परतली. विराट अनुष्काला घ्यायला मुंबई विमानतळावरही गेला होता.सध्या सोशल मीडियावरही दोघं एकमेकांवरचे प्रेम दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. आधी विराटने अनुष्कासोबतचा दक्षिण आफ्रिकेमधील एक फोटो शेअर केला होता. तर आता अनुष्काने विराटला किस करतानाचा फोटो शेअर केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता रक्तदाब निरीक्षणासाठी मोबाइल अ‍ॅप