विराट कोहलीचे दमदार प्रदर्शन बघून आपण त्याच्या फिटनेसचा अंदाज बांधू शकता. फिट कॅप्टन होण्यासाठी विराटने खूप मेहनत घेतली आहे. अलीकडेच एका चॅट शोमध्ये विराटने फिटनेसप्रती आपले प्रेम जाहीर केले. फिटनेससाठी त्याने चार वर्षांपासून बटर चिकनला हातदेखील लावला नाही तर गोड पदार्थांचे आवड असली तरी ते गोड खात नाही.
विराट क्रिकेट सीझनमध्ये दीड तास तर ऑफ सीझनमध्ये चार तास जिम मध्ये घालवतो. आणि आता बघू त्याचे डाइट शेड्यूल:
ब्रेकफास्ट: आम्लेट, तीन एग व्हाईट्स, एक संपूर्ण अंडं, ब्लॅक पीपर, चीज आणि पालक यासह त्याचा दिवस सुरू होतो.
लंच: स्मोक्ड सॅल्मन, ग्रील्ड फिश आणि पपई. मसल्स ग्रोथ करायची असल्यास रेड मीटचे प्रमाण वाढवतो नाहीतर ग्रील्ड चिकन आणि मॅश पोटेटो आणि पालकाचे सेवन करतो. बटरची मात्रा भरपूर घेणारा विराट म्हणतो की खेळत असताना टरबूज घेणे पसंत करतो.
डिनर: सीफूड मोठ्या प्रमाणात घेत असतो ज्यातून फिश माझी फेव्हरेट आहे.
विराट म्हणतो की जेव्हा डाइट चीटिंग करण्याची इच्छा असते तेव्हा सरळ छोले भटुरे किंवा कुल्चा खातो.