Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेणार

विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेणार
, शनिवार, 10 मे 2025 (11:56 IST)
काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीचा हा निर्णय आला आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती काही दिवसांत भेटणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सांगितले आहे की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छितो. तसेच, बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहेअशी माहिती समोर आली आहे. तसेच एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोहलीने आपले मन बनवले आहे आणि तो कसोटी क्रिकेट सोडणार असल्याचे बोर्डाला कळवले आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा लवकरच येत असल्याने बीसीसीआयने त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. कोहलीने अजून या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताने उडवला पाकिस्तानचा लाँच पॅड