Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

काय सांगता,शाहिद आफ्रिदी ने तालिबान ची स्तुती केली

काय सांगता,शाहिद आफ्रिदी ने तालिबान ची स्तुती केली
, मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (13:57 IST)
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदीचे वादाशी घट्ट नातं आहे. शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा आपल्या दिलेल्या विधानामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच तालिबानवर दिलेले विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
 
पाकिस्तानी पत्रकार नलिया इनायत यांनी ट्विटरवर शाहिद आफ्रिदीच्या मीडिया संभाषणात दिलेल्या एका व्हिडिओ क्लिपिंगला अपलोड करून ही माहिती दिली. या व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदी तालिबानींची स्तुती करत आहे.
 
व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदी म्हणत आहे की तालिबान या वेळी अतिशय सकारात्मक मानसिकतेने वेढले आहेत. आपण या गोष्टी यापूर्वी पाहत नव्हतो. यावेळी त्याचे पुनरागमन चांगले आहे आणि त्यांनी  महिलांनाही काम करण्याची परवानगी दिली आहे.
 
याशिवाय शाहिद आफ्रिदी म्हणत आहे की तालिबान हे क्रिकेट प्रेमी लोक आहेत.त्यांना  क्रिकेट खूप आवडते. अलीकडच्या मालिकेसाठी त्याने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
 
शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. या विषयावर अशी काही ट्विट्स समोर आली.
 
वर्ष 2016 नंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाहिदआफ्रिदी कधीही पाकिस्तान संघात सामील झाला नाही.शाहिद आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसत आहे.शाहिदने पाकिस्तान संघासाठी 5 विश्वचषक खेळले आहे. ज्यापैकी ते 2 मध्ये कर्णधार होते.
 
शाहिद आफ्रिदीने सलग दोन टी -20 विश्वचषकांमध्ये मालिकावीरचे विजेतेपद पटकावले आहे आणि चेंडू आणि बॅटने 2009 मध्ये पाकिस्तानच्या टी -20 विश्वचषक विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे.
 
आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांच्या 369 डावांमध्ये 117.00 च्या स्ट्राईक रेटने एकूण 8064 धावा केल्या. एवढेच नाही तर त्याच्या नावावर 395 एकदिवसीय विकेट्सही आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 12 धावां देऊन 7 विकेट घेण्याची आहे.
 
पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय कारकिर्दीत 6 शतके लावले आहेत, त्यापैकी त्याने 4 शतकांसाठी 100 पेक्षा कमी चेंडूंचा सामना केला. आफ्रिदीने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा फक्त 36 चेंडूत सर्वात वेगवान शतक (102 धावा) केले. 4 ऑक्टोबर 1996 रोजी नैरोबीमध्ये त्याने या डावात 11 चौकार आणि 6 षटकार मारले.
 
शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर देखील मैदानात अनेक वेळा समोरासमोर आले आहेत. त्याचवेळी, मैदाना बाहेर ही गौतम गंभीरने त्याच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, पुराचे संकट