Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रिकेटविश्वात अमेरिकन 'डॉलर'च्या एन्ट्रीने भारताच्या वर्चस्वाला आव्हान मिळेल का?

Webdunia
सोमवार, 3 जून 2024 (10:10 IST)
यंदा पहिल्यांदाच अमेरिकेत टी-20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. यजमान अमेरिकेनेही या स्पर्धेची जय्यत तयारी केलेली दिसून येतेय.
 
आजवर भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशांपुरता मर्यादित असलेला हा खेळ पहिल्यांदाच अमेरिकेत एवढ्या मोठ्या स्तरावर खेळला जातोय.
 
आयसीसी आणि जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेबाबत उत्साह दाखवला असला तरी हा उत्साह अमेरिकन प्रेक्षकांना क्रिकेटच्या मैदानात खेचून आणण्यात यशस्वी होईल का? हा प्रश्नच आहे.
अमेरिकेसाठी क्रिकेट हा अगदीच नवखा खेळ नाही. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकेत सुमारे 300 वर्षांपासून क्रिकेट खेळलं जातंय, लोकप्रियतेच्या बाबतीतही क्रिकेट कमी होता असं मुळीच नाही.
 
इंग्लंडने त्यांच्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कितीतरी आधी अमेरिकेचा दौरा केला होता. पण अमेरिकेने ज्या पद्धतीने बोस्टन टी-पार्टी करून ब्रिटिशांचा चहा धुडकावून लावला होता अगदी तसंच काहीसं क्रिकेटच्या बाबतीतही घडल्याचं दिसतंय.
 
यामुळेच इंग्लिश आत्म्याचा हा खेळ अमेरिकन नागरिकांच्या पसंतीस उतरला नाही आणि क्रिकेटची जागा बेसबॉल या खेळाने घेतली आणि बेसबॉल अमेरिकेत लोकप्रिय खेळ ठरला.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने, मागच्या दशकात क्रिकेटच्या प्रसारासाठी, जे काही क्रांतिकारी निर्णय घेतले, त्या निर्णयांमुळे आज 90 पेक्षा अधिक देश आंतरराष्ट्रीय पातळीवर टी-20 क्रिकेट खेळतात.
 
या सगळ्या देशांना आंतरराष्ट्रीय संघांचा दर्जा मिळाल्यामुळेच आज क्रिकेटचा विश्वचषक अमेरिकेत होतो आहे.
 
आता मागच्या वर्षी झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे ही स्पर्धा लोकप्रियतेच्या बाबतीत 'फ्लॉप' ठरेल की अमेरिकेत सुरू असलेल्या स्पर्धेत गर्दीचे उच्चांक मोडले जातील हे तर माहीत नाही पण हे स्पष्ट आहे की या स्पर्धेमुळे एक नवीन प्रेक्षकवर्ग जोडला जाईल आणि क्रिकेटसाठी जागतिक पातळीवरची आणखी एक मोठी बाजारपेठ यानिमित्ताने खुली होईल.
 
अमेरिकेत ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या वापरल्या जातील
भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा आहे. आयसीसीला सगळ्यात जास्त महसूल देणारा देश म्हणूनही भारत ओळखला जातो. सुमारे 125 कोटी लोकांची ही सगळ्यांत मोठी बाजारपेठ आहे.
 
कोसळलेली अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणांमुळे जर पाकिस्तान अडचणीत सापडला नसता तर भारतानंतरची सगळ्यांत मोठी क्रिकेटची बाजारपेठ म्हणून पाकिस्तानची ओळख राहिली असती.
 
पण अमेरिकेत होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकामुळे क्रिकेटच्या अर्थव्यवस्थेत मोठे क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे. अमेरिकेसारखा महासत्ता असलेला देश क्रिकेटच्या वर्तुळात आल्यामुळे मोठे बदल होऊ शकतात.
 
जागतिक राजकारणात अमेरिकेचा प्रभाव बघितला तर क्रिकेटमध्येही अमेरिका भारतीय वर्चस्वाला सहज आव्हान देऊ शकेल. कारण जागतिक अर्थव्यवस्था चालवणाऱ्या डॉलरला इतर कोण टक्कर देऊ शकेल?
 
यावर्षी पहिल्यांदाच विश्वचषकात 20 संघ सहभागी झाले आहेत. यापूर्वी झालेल्या विश्वचषकांमध्ये 10 ते 12 संघ सहभागी व्हायचे. संघांची संख्या वाढल्यामुळे हा विश्वचषक क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
 
फुटबॉल हा जगातला सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळ असल्याचं बोललं जातं, क्रिकेटला फुटबॉलएवढी लोकप्रियता मिळवण्यासाठी अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागणार आहे. मात्र जगातला दुसरा सगळ्यांत जास्त लोकप्रिय खेळ होण्याच्या दिशेने क्रिकेट वाटचाल करत आहे हे मात्र नक्की.
 
क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोण विजयी होणार याचं भाकीत वर्तवताना त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांच्या क्षमतांसोबतच, यजमान देशातल्या खेळपट्ट्या आणि वातावरणाची आकडेवारी देखील महत्त्वाची ठरत असते. दुर्दैवाने अमेरिकेतील स्पर्धेबाबत ही माहिती उपलब्ध नाही.
 
ज्या मैदानांवर विश्वचषकाचे सामने होणार आहेत त्यापैकी बऱ्याच मैदानांवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवले जातील. अमेरिकेत क्रिकेटची मैदानं तयार करत असताना त्यासाठीच्या खेळपट्ट्या या ऑस्ट्रेलियाहून आयात करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे, अमेरिकेच्या वातावरणात या ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर कसा खेळ होईल हे कुणीही सांगू शकत नाही.
 
फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल
अमेरिकेतली परिस्थिती नवीन असली तरी या विश्वचषकातले काही सामने कॅरेबियन बेटांवर होणार आहेत. आता वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्या, तिथलं वातावरण आणि मैदानं क्रिकेटविश्वासाठी नवीन नाहीत. अलीकडच्या काळातली वेस्ट इंडिजमधली आकडेवारी उपलब्ध आहे आणि ही आकडेवारी विश्वचषकाचं नियोजन करत असताना महत्त्वाची असणार आहे.
 
असं असलं तरीही विश्वचषकात धावांचे डोंगर उभारले जातील असं म्हणणं घाईच ठरेल.
 
भूतकाळाचा विचार केला तर असं म्हणता येईल की वेस्ट इंडिजमधल्या खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजांची पोषक ठरतील, तसेच शेवटच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांचा चेंडू रिव्हर्स स्विंगसुद्धा होऊ शकतो. यामुळे आशियाई संघांना याचा थोडाफार फायदा होईल असं दिसतंय.
पाकिस्तान व्यतिरिक्त इतर मातब्बर संघातले खेळाडू नुकतेच आयपीएल खेळून अमेरिकेला जात आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंनी आयपीएलचे सामने खेळले नसले तरी त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय दौरे करून विश्वचषकाच्या तयारीची कसर भरून काढलेली आहे.
 
या तिन्ही मालिकांमध्ये पाकिस्तानला सकारात्मक निकाल हाती लागले नसले तरी क्षमता आणि अनुभवाच्या कसोटीवर पाकिस्तानचा संघ इतर कोणत्याही संघाच्या तोडीचा आहे.
 
मागील काही सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना सूर गवसलेला नसला, तरी विश्वचषकाच्या सुरुवातीनंतर पाकिस्तानच्या संघाने अंतिम निवडीत समतोल साधण्यात यश मिळवलं तर हा संघ अगदी सहज उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकतो.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा

अफगाणिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली

संजय बांगरच्या मुलाचे लिंग बदलले, आर्यनपासून अनाया बनला

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पुढील लेख
Show comments