रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लिलावात खेळाडूंची खरेदी करून आपला संघ पूर्ण केला आहे. या लिलावात बंगळुरूने 7 खेळाडू विकत घेतले आहेत.लिलावापूर्वी, फ्रँचायझीने 7 खेळाडूंना सोडले होते आणि संघाकडे 3.35 कोटी रुपये शिल्लक होते. मिनी लिलावात संघाकडे एकूण 10 रिक्त जागा होत्या, ज्या संघाने आता भरल्या आहेत.आरसीबीने एकता बिश्तसाठी सर्वाधिक 60 लाख रुपये खर्च केले.