Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवराज सिंग बाबा झाला, पत्नी हेजल कीचने मुलाला जन्म दिला

Yuvraj Singh became a father
, बुधवार, 26 जानेवारी 2022 (11:02 IST)
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर असलेला युवराज सिंग बाबा  झाला आहे. माजी क्रिकेटपटूने सोशल मीडियाद्वारे ही चांगली बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली, परंतु यावेळी लोक त्याच्या गोपनीयतेचा आदर करतील अशी आशा देखील व्यक्त केली. सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करणाऱ्या युवीने सांगितले की, हेजल कीचने मुलाला जन्म दिला आहे. काही काळ डेट केल्यानंतर युवराज आणि हेजलने नोव्हेंबर2016 मध्ये लग्न केले. युवराजने 10 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
 
इंस्टाग्रामवर आनंदाची बातमी शेअर करत युवराज सिंगने लिहिले, 'आमच्या सर्व चाहते, कुटुंब आणि मित्रांसाठी. आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्हाला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. या आशीर्वादासाठी आम्ही देवाचे आभार मानतो आणि आशा करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल. युवराज आणि हेजलने शीख आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. गुरुद्वारामध्ये लग्न केल्यानंतर दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगही केले होते. 2007 T20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा भाग असलेल्या युवीने भारतासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
 
हेजल कीच एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हेजल कीच बॉडीगार्ड या चित्रपटात सलमान खान आणि करीना कपूरसोबत दिसली होती. याशिवाय ती बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 2013 च्या सीझनमध्येही दिसली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्पल पर्रिकरांच्या मुद्यावरून शिवसेनेत दोन गट?