Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच होणार

94th akhil bhartiya marathi sahitya sammelan
, शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (16:41 IST)
आगामी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.
 
९४व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते. यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारत ९४व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली. दरम्यान, गेल्या वर्षीचं ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडलं होतं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोविड -19 मुळे कोपा फुटबॉल उपांत्य फेरी पुढे ढकलण्यात आली