रिव्हर मार्च या संस्थेच्या वतीने दहिसरमध्ये "रिव्हर मार्च" या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला माननीय अमृता फडणवीस, भाजपचे राम कदम, सामाजिक कार्यकर्ते विक्रम चोगले, गोपाळ झवेरी या कार्यक्रमाला उपस्थित होते, शिवाय अभिनेता सुमित राघवन याने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळेस नद्यांची निगा राखण्याचे आव्हान अमृता फडणवीस यांनी केले तर नद्यांच्या मुद्यावरून काँग्रेसने जे राजकारण सुरु आहे, ते कुठे तरी थांबवले पाहिजे. तसेच नद्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करा,असा सल्ला राम कदम दिला.
पार पडलेल्या रिव्हर मार्चच्या या रॅलीला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला, तर जवळपास २००० नागरिकांचा पाठिंबा लाभला होता. उपस्थित असलेल्या लोकांनी नद्यांच्या स्वच्छतेचे आवाहान या रॅलीमार्फत लोकांना केले.
नुकतचं रिव्हर मार्च अँथम गाण्याचं लाँचिंग करण्यात आलं
नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. वळणावळणांचा प्रवास करीत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला आपण नदी म्हणतो. नदीचा उगम हा तलाव, मोठे झरे यांच्या पासून होतो. या नद्यांमुळे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होतो. यामुळेच या नद्यांचे संवर्धन करणे फार गरजेचे आहे. मुंबईतील ४ नद्यांची दुरावस्था बघून मुंबईतील विशिष्ट मंडळींनी एकत्र येऊन नद्यांच्या संरक्षणाचे काम सुरु केले. त्यातून "रिव्हर मार्च" या संस्थेचा उगम झाला.
"रिव्हर मार्च" हि संस्था गेली ४ वर्षे वेगवेगळ्या माध्यमातून नद्या पुनरुजीवित आणि संवर्धन करण्याच्या मोहीमा राबवित आहेत. जनतेला या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी नद्यांवर आधारित एक गीत तयार करण्यात आले आहे. या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे नद्यांवर चित्रित केले गेलेले तसेच त्यांची माहिती सांगणारे हे गीत आहे. या गीताला अमृता फडणवीस तसेच सोनू निगम यांचा आवाज लाभला आहे. या गीताची आणखी एक खासियत म्हणजे या गीताच्या काही भागात आपल्याला मा. देवेंद्र फडणवीस हेही जनतेला या गीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना आवाहन करताना दिसतात.
मुंबईतील या ४ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या मोहिमेत जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्यास नद्या स्वच्छ तसेच सुरक्षित ठेवण्याच्या कामला गती मिळेल असे लक्षात आले. हि मोहीम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, याकरिता हिंदी व मराठी भाषेत जनतेला आवाहन करणारी एक संगीत चित्रफित करण्याचे रिव्हर मार्च या संस्थेने ठरवले. या कार्यात त्यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस तसेच वनमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांना सहभागी होण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन या कार्यात हे तिन्ही मान्यवर सहभागी झाले.
अभिजित जोशी यांनी लिहिलेल्या "कधी इथे, कधी तिथे ही भासे,हरवून भान बेभान हासे अवखळ" असे या गीताचे बोल आहेत. कामोद सुभाष यांनी या गीताला संगीतबद्ध केले आहे. या संपूर्ण चित्रफितीचा केला निर्मिती खर्च लीला प्रॉडक्शन तसेच रिव्हर मार्च यांनी केला आहे. सचिन गुप्ता या चित्रफितीचे दिग्दर्शन केले आहे. लीला प्रॉडक्शन, रिव्हर मार्च, विक्रम चोगले, अभिजित जोशी, सचिन गुप्ता, कामोद सुभाष यांच्या सयुंक्त प्रयत्नांतून नद्यांची माहिती सांगणारं हे गीत जनतेसाठी प्रोत्सहानपर तसेच सकारात्मक ठरेल. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून मराठी भाषेमधील हे गाणं २७ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आलं आहे.