Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lokmanya Tilak Jayanti 2023 प्रखर संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

Webdunia
Lokmanya Tilak Jayanti 2023 बाळ गंगाधर टिळक, आपण यांचे नाव घेतल्यावर आपल्याला त्यांचे 'स्वराज्य', 'राजकारण' आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेल्या कामांची आठवण होते. पण या व्यतिरिक्त ते प्रखर 'संपादक' देखील होते. टिळक ह्यांनी केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.
 
4 जानेवारी 1881 मध्ये केसरी आणि 2 जानेवारी 1881 मध्ये मराठा वृत्तपत्र निघण्यास सुरुवात झाली. मूळात हे वृत्त पत्र बाळ गंगाधर टिळक ह्यांनी विष्णू कृष्णा चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर ह्यांच्यासोबत सुरु केले होते. हे पत्र 'केसरी वाडा' नारायण पेठ, पुणे, ज्याचे नाव पूर्वी 'गायकवाड वाडा' ही होता येथून निघायचे. भारतीय स्वातंत्र्य क्रांतीच्या इतिहासात केसरी वाड्याचे महत्त्वाचे स्थान आहे. हे रात्रभर स्वातंत्र्य क्रांतीचे चर्चेसाठी प्रख्यात राष्ट्रीय नेत्यांचे ठिकाण असायचे.
 
दोन्ही वृत्त पत्रांद्वारे राष्ट्रीय स्वातंत्र मिळविण्यासाठी सक्रियपणे प्रचार केला. स्वातंत्र्यपूर्वी काळात सामाजिक-राजकीय चळवळीबद्दल कार्य करून केसरीने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या पत्रांचे मूळ उद्देश्य लोकांमध्ये राजकीय चेतना जागृत करायचे होते. टिळक ह्यांनी 4 मुख्य विषय, 'स्वराज्य', 'स्वदेशी', 'बहिष्कार' आणि 'राष्ट्रीय शिक्षा' ह्यांना केसरीमध्ये प्रकाशित केले आणि ह्यांचा प्रचार प्रसार केला.
 
जिथे 'केसरी' मराठी भाषी लोकांना जागृत करायचं कार्य निरंतर करत होतं तिथे 'मराठा' द्वारे गैर मराठी लोकांना इंग्रेजांची नीती आणि माहिती मिळत होती. ह्याचे दोन कार्य होते, पहिले इंग्रेजांना त्यांनी काय केले आणि काय करायचे होते ह्याची माहिती देणे तर दुसरं म्हणजे इतरांना इंग्रेजांची माहिती देऊन जागृत करणे.
 
आगरकरांनी 1887 मध्ये स्वत:चे वृत्तपत्र 'सुदारक' हे सुरू करण्यासाठी केसरी सोडले. जेव्हा टिळकांना 1897 आणि 1908 मध्ये तुरुंगात पाठवण्यात आले तेव्हा टिळकांचे जवळचे सहकारी नरसिंह चिंतामण केळकर यांनी दोनदा संपादक म्हणून काम केले.
 
बाळ गंगाधर टिळक ह्यांच्यावर दोन्दा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. २२ जून १८९७ रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला त्यावेळी टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले ज्याचा परिणाम त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप झाला असून खटला भरला. ६ सप्टेंबर १८९८ रोजी तुरुंगातून मुक्त झाले.
 
लॉर्ड कर्झन याने २० जुलै १९०५ रोजी बंगालची फाळणी जाहीर केली. ‘देशाचे दुर्दैव’ व ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हे अनुक्रमे १२ मे १९०८ व ९ जून १९०८ च्या केसरीतील अग्रलेखांमुळे २४ जून १९०८ रोजी टिळकांना मुंबईस पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला. सहा वर्षांच्या कारावासानंतर १५ जून १९१४ रोजी सरकारने त्यांना मुक्त केले.
 
‘‘आकाश जरी माझ्यावर कोसळले, तरी त्यावर पाय देऊन मी उभा राहीन.’’ - बाळ गंगाधर टिळक
 
टिळकांनी केसरीतून अनेक सरस अग्रलेख लिहिले ज्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला तथापि त्यांनी विचलित न होता लेखन विषयक धोरणात बदल केला नाही. या प्रसंगांमुळे आपल्याला हे कळून येतं की बाळ गंगाधर टिळक यांना कोणीही थांबवू शकले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार,आदित्य ठाकरेला आव्हान देणार!

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

EY कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांची "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून टॅक्सी चालकाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments