Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

या मंदिरात प्रसाद म्हणून वाटले जाते फास्ट फूड

या मंदिरात प्रसाद म्हणून वाटले जाते फास्ट फूड
देशातील अनेक मंदिरामध्ये देवी-देवतांना वेगवेगळा नैवैद्य दाखवला जातो आणि मंदिरात येणार्‍या भाविकांसाठी तो नैवेद्य प्रसाद म्हणून दिला जातो. मात्र दक्षिणेकडील एका मंदिरात या नैवैद्याऐवजी चक्क फास्ट फूडच प्रसाद म्हणून वाटले जाते. पोंगल किंवा पायसम हे पदार्थ प्रसाद म्हणून दक्षिणेकडच्या मंदिरात वाटत असतात. पण चेन्नईमधील जया दुर्गा पीठात भक्तांना प्रसाद म्हणून ब्राऊनी, बर्गर, सँडविच, चेरी टॉमेटो सॅलॅड दिले जात आहे.
मंदिरातील एका कर्मचार्‍याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, जे अन्न सकस असते आणि चांगल्या मनाने बनवले जाते, ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायला काय हरकत आहे, मग ते पारंपारिक पदार्थ असो किंवा फास्ट फूड असो. आमच्या जया दुर्गा मंदिरातील प्रसादच त्याचे वैशिष्टय आहे. त्यामुळे अनेक भक्त येथे प्रसादासाठी येतात. 
 
कर्मचार्‍याने सांगितले की फास्टफूड सोडाच वाढदिवसाच्या दिवशी अनेक भक्त मंदिरात देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्यासाठी खास केकही तयार करण्यात येतात. बाकीच्यांचे माहित नाही पण येथील स्थानिकांना मात्र हा प्रसाद आवडत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रायगडमध्ये जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद